Uncategorized
जळगाव शहराला उच्चशिक्षित आमदार पाहिजे.

जळगाव शहर तर विद्यापीठ ,न्यायालय, कलेक्टर,एसपी, महानगरपालिका असलेले शहर आहे.येथे नामांकित डॉक्टर, वकील आहेत.मोठी एमआयडीसी आहे.तरीही अशिक्षित आमदार कसे? काहीतरी चुकतंय!
जर आपल्या जनतेचे कलेक्टर, एसपी, आयुक्त, न्यायालय, विद्यापीठ, महसूल, पोलिस, बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, जिल्हा परिषद सोबत काम आहे तर तेथे ज्ञान असणे आवश्यक आहे.अशीक्षित माणूस काय बोलू शकतो?", साहेब आमची हात जोडून विनंती आहे तुम्हाला.आमचे एवढे काम करून द्या."हीच भाषा आमदाराची असली तर कशाला कामे होतील?ते काय वाण्याचे दुकान आहे.मला तेल,गुळ, मीठ बांधून द्या.नाही!येथे चालतो कायदा.येथे पाहिजे अभ्यास.येथे पाहिजे वाचन.येथे पाहिजे शिक्षण.येथे पाहिजे बुद्धी.येथे पाहिजे ज्ञान.जर तेच नसेल तर हात जोडून,पाय धरून,दीन होऊन कामाची भीक मागावी लागेल.आणि नाही केले तर तुम्ही काय करून घेणार?काहीही करून घेण्याचेही ज्ञान नसेल तर!तर मग,साहेबाला ख्यालीखुशाली द्यावी लागेल.जशी आपण खरेदी विक्री करतांना रजिस्टरला देतो.जशी आपण सातबारावर नांव लावण्यासाठी तलाठीला देतो.जशी आपण बांधकाम परवानगी साठी नगरपालिका अभियंता व आयुक्तला देतो.असे देऊन देऊन आपली कमावलेली संपत्ती नोकर खाऊन जातात.एका वर्षात हे नोकर आणि अधिकारी जळगाव शहरातून शंभर कोटी लुटून जातात.या लुटमारी साठी जळगावला पोष्टींग करून घेतात.ही माहीती गुलाबराव पाटील, गिरीश महाजन किंवा सुरेश भोळे यांनी कधी सांगितली का?नाही सांगणार!कारण या लुटमारीत हे आपलेच आमदार खासदार मंत्री सामील झाले आहेत."साहेब,आमचे आम्हाला काढून द्या,मग तुम्ही काय करायचे ते करा."
तरूणांना नवरात्र, शिवरात्र, शिवजयंती, गणपती ला हे आमदार खासदार मंत्री देणगी देतात.तरूण कार्यक्रम तर करतातच पण उरलेल्या पैशातून नाच गाणे दारू मटण सिगारेट मधे धुंद होतात.पुढे काय?पुढे सत्यानाश!त्यांचं पोरगं बिघडलं.यांचेही बिघडलं.म्हणून जळगाव ला गुन्हेगारी वाढली आहे.याला जबाबदार आपलेच आमदार खासदार मंत्री आहेत.हे आमच्या तुमच्या पोरांना दारू दर्फडा चा नाद लावतात.म्हणून हे कॉलेज ला जात नाहीत.तर पुढे काय नोकरी करणार? म्हणून जळगाव मधे तरूणांची गुन्हेगारी वाढली आहे.याला जबाबदार आपलेच आमदार खासदार मंत्री आहे.
जर आपलं पोरगं जातीचा दाखला काढायला गेले तर कोणता आमदार खासदार मंत्री मदत करतो? कशाला मदत करील? त्याला ते ज्ञान तर पाहिजे.कायदा तर माहीत पाहिजे.तर मग जातीचा दाखला, पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही.अडले ना घोडं, स्कॉलरशिप आणि नोकरीचं!
आता जळगाव शहरासाठी तीनशे कोटी अलौट झाले.हे काही आमदारांनी घाम गाळून आणले नाही.हानिमूनला गेले,पोटशी झाले. तसंच..इतके सोपं आहे.तो तर आपल्याच कराचा पैसा आहे.मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री काय देईल,त्याचा बाप देईल.नाहीतर मी बसलो आहे ना! त्याचे पाप चावडीवर वाचायला!हे काम मामाचे किंवा भाऊचे नाही.हे आम्ही करून दाखवतो.म्हणून तर रुबाबात सांग तर ओ,लिहीतो, "आमदार साहेब रस्ता बनवा नाहीतर राजीनामा द्या." ही हिंमत कोणी दारूवाला,रेतीवाला, कमीशन खोरं,हप्तेखोर नाही करू शकत! त्यासाठी बुलंद आवाज पाहिजे.चोरून लपून खीर चाटणाऱ्या बोका किंवा मांजरीचे हे काम नाही! त्यांनी खीर चाटून घ्यावी आणि आपण त्यांच्या उष्ट्या मिशा चाटत बसायच्या का?
म्हणून म्हणतो, पोटापाण्यापुरते कमवण्याची अक्कल सर्वांना असते.देवाने दिली आहे.काही चोरी करायची गरज नाही.भीक मागायची गरज नाही.घरात चार साड्या असतांना बेवडा भाऊ आणि लफडा मामा कडून पांचवी साडी मागायची गरज नाही.खानदानी बाई बापाचे नांव खराब करणार नाही.नवरा टुकार,भिकार निघाला म्हणून काय झाले? देवाने दोन हात,दोन पाय दिले आहेत.अशी भीकेची साडी नेसली तर सगेसोयरे काय म्हणतील? पोटची पोरं काय म्हणतील?सख्खा मामा तर सुंगत नाही.हा कोणता मामा उगवला,तुला साडी द्यायला?
आता जळगाव शहरासाठी,बाया माणसांसाठी अशी भीक नको.आम्हाला पाहिजे आमच्या हक्काचे.निधी सुद्धा आमच्या हक्काचा आहे.नोकर पण आमच्याच कामासाठी आहेत.आता नो लांच,नो लफडा.नो कमीशन,नो टक्कवारी .पण,यासाठी आमदार तर दमदार पाहिजे.
….. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
१५/१०/२०२४



