आजा १२ वीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज, २१ मे २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ
विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे.
अधिकृत वेबसाईट्स :
आज दुपारी १.०० वाजता १२ वी बोर्ड परीक्षांचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहेत.
http://result.digilocker.gov.in mahresult.nic.in http://results.targetpublications.org http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in



