डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव, तेल्हाराचे प्राचार्य डॉ.गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे
दि०६; स्थानिक डॉ.गो. खे.महाविद्यालयामध्ये दि.०६ नोव्हेंबर २०२३ रोजी वाणिज्य विभागाच्या वतीने सत्र २०२३-२४ च्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.यामध्ये वाणिज्य अभ्यास मंडळाची सत्र २०२३-२४ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.राहुल सुडके तर मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून राजे संभाजी अकॅडमी तेल्हारा चे संचालक श्री.सुधीर ताकोते हे उपस्थित होते.तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एम.पी.चोपडे व परीक्षा विभाग प्रमुख डॉ.एम.एम.कवरके उपस्थित होते.श्री सुधीर ताकोते यांनी सत्र २०२३-२४ ची कार्यकारिणी जाहीर केली त्यानंतर विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील उपयुक्त असणाऱ्या स्पर्धा परीक्षेविषयी सविस्तर माहिती दिली.तर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन सर्व उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा असे मत डॉ.कवरके यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एम.पी.चोपडे यांनी केले व वाणिज्य अभ्यास मंडळाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.डॉ.राहुल सूडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वसमावेशक शिक्षण घ्यावे असे मत व्यक्त केले.यावर्षीच्या कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष म्हणून प्रसाद प्रमोद अवचार, उपाध्यक्ष गोपाल विखे,सचिव कुलदीप दिनकर कडू,कोषाध्यक्ष विनायक वासुदेव कतोरे तर सदस्य म्हणून वैष्णवी हीवसे,निकिता विरघट,प्रणिता देशमुख,यश पोहरकर,महेश वानखडे,योगेश शर्मा या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वप्नील फोकमारे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. वासनकार यांनी केले.या कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने तर सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली. हा कार्यक्रम डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. याप्रसंगी प्रा अभिनव पुंडकर व प्रा.पायल उन्हाळे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सचिन ढोले व हिम्मत फोकमारे यांनी परिश्रम घेतले.वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.








