Uncategorized

जळगावातील आरटीओ अधिकारी दीपक पाटील यांना ३ लाखांची लाच भोवली ; पंटर एसीबीच्या जाळ्यात

lजळगाव,

जळगाव येथील आरटीओ कार्यालयातून धक्कादायक बातमी समोर आलीय. आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक करण्यात आल्याची घटना आज घडल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जागी दीपक पाटील यांनी आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्याला नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. संबंधीत अधिकाऱ्याने या प्रकरणी लाचलुचपत खात्याच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील कार्यालयात तक्रार केली. या प्रकरणाची खातरजमा झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एक पथक तयार केले. या पथकाने आज दुपारी दीपक पाटील यांना भीकन भावे या पंटरच्या माध्यमातून तीन लाख रूपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केली.

या कारवाईत आरटीओच्या मुख्य अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात अटकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दीपक अण्णा पाटील ( वय 56, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ता. जि. जळगाव ) आणि भिकन मुकुंद भावे (वय 52, रा. आदर्श नगर प्लॉट नं. 98 ,जळगाव ) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button