डॉ. भूषण कोरडेचे यश अनेकांना प्रेरणा देईल -नगराध्यक्षा सुलभाताई दुतोंडे

हिवरखेड वार्ताहर
हिवरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या डॉ. भूषण भास्करराव कोरडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील डीएम. निओनेटोलॉजि ही सर्वोच्च पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त करून ही पदवी मिळवणारे ते विदर्भातील पहिले डॉक्टर ठरले त्यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे उद्गार हिवरखेडच्या नगराध्यक्षा व डॉ. भूषण कोरडे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुलभाताई दुतोंडे यांनी काढले. स्थानिक श्री विठ्ठल मंदिर संस्थांनच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री अनिलदादा गावंडे यांच्या शुभहस्ते डॉ. भूषण कोरडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना अनिल गावंडे यांनी भूषण कोरडे यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करत त्यांनी व त्यांच्या वडिलांनी केलेल्या संघर्षाची प्रशंसा केली. यावेळी हिवरखेडचे माजी उपसरपंच रमेशभाऊ दुतोंडे, माजी जि. प. शिक्षण सभापती मुन्नाभाऊ मिरसाहेब, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्ला खान पठाण, हिवरखेडचे स्वीकृत नगरसेवक श्यामशील भोपळे, नगर परिषद विरोधी पक्षनेता रवि (राणा ) घुंगड, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनिल इंगळे,तेल्हारा पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर पोके, इत्यादीची समायोचित भाषणे झालीत.डॉ.भूषणचे वडील डॉ. भास्करराव कोरडे भूषणचा संघर्ष व नियतीने घेतलेली त्यांची परिक्षा सांगताना भावूक झाले होते.याप्रसंगी डॉ. विलासराव भांबूरकर, डॉ. विनायकराव बाजारे, डॉ. श्रीकांत शिंगोकार, स्विकृत नगरसेवक किरण सेदानी, पोलीस पाटील प्रकाश गावंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र कराळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास घुंगड यांनी केले.



