
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
जळगाव (जा) : दिनांक 27/01/2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे बालकलाकारांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले या कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* सौ.अलका प्रशांत चव्हाण यांनी केले तसेच कार्यक्रमाचे *अध्यक्ष* म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री लाला भाऊ मानकर हे होते. कार्यक्रमाचे *उद्घाटक* गावचे सरपंच मा. श्री अशोक भाऊ ढोले, कार्यक्रमासाठी *प्रमुख पाहुणे* म्हणून लाभलेले मा. बंडूभाऊ अवचार, हे उपस्थित होते तसेच *ग्रामपंचायत सदस्य* सचिन भाऊ जाधव , आणि सौ. कळस्कर ताई हे होते. याचबरोबर शाळा *व्यवस्थापन समिती* सदस्य पूजाताई दांडगे, बुंदे ताई, बहादरे ताई, जाधव ताई तसेच पिंपळगाव काळे केंद्राचे *केंद्रप्रमुख* मा. श्री ठोंबरे सर हे सर्वजन कार्यक्रमाला उपस्थित होते.
आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली, त्यानंतर स्वागत गीत व गणेश वंदना घेऊन कार्यक्रमाला रीतसर सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला रंगतरंग असे नाव देण्यात आले चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे आपले नृत्य सादर केले या स्नेहसंमेलनात एकूण 25 गाण्यांचा सहभाग होता.
“स्नेहसंमेलन” या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरडकर सर यांनी केले शेवटी “शाळा मराठी माझी शाळा मराठी” या गाण्याने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात पालक वर्ग गावकरी मंडळी उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाचा खूप खूप आनंद घेतला आनंद उत्साह व जोशात हा कार्यक्रम पार पडला.



