Uncategorized

चलो मुक्ताईनगर…. चलो मुक्ताईनगर..परभणी विटंबना प्रकरण, व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा जाब विचारण्यासाठी “निषेध आंदोलन”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी


नमस्कार,जयभीम.. जय संविधान
याद्वारे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व समस्त संविधानप्रेमी जनतेस आवाहन करण्यात येते की, तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे दि. 17डिसेंबर 2024 मंगळवार रोजी ठीक 12 वाजता परभणी येथील संविधान शिल्पाच्या विटंबना प्रकरणातील आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे तसेच पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना व सूत्रधारांवर कठोर कार्यवाही व्हावी व आंदोलक भीमसैनिकांचे चाललेले अवैधरित्या कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे याकरीता निषेध आंदोलन मा.तहसिलदार तसेच मा.पोलीस निरीक्षक यांना निवेदन तालुका अध्यक्ष मा.दिलीप पोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली सादर केले जाणार आहे.तरी या निषेध आंदोलनास संविधानप्रेमी नागरीकांनी,वंचितच्या सर्व विंगच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
एकत्रित होण्याचे ठिकाण:- प्रवर्तन चौक , मुक्ताईनगर जि.जळगांव
आपले विनीत
, मा.संजय ब्राह्मणे लोकसभा व विधानसभा उमेदवार,मा.विश्वनाथ मोरे, जळगांव जिल्हा सचिव ,
मा.समाधान गवई, जेष्ठ मार्गदर्शक,मा.एस.एस.तायडे सर जेष्ठ मार्गदर्शक,
, तालुका सरचिटणीस संजय धुंदले
वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तालुका समस्त कार्यकारिणी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button