चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विषबाधा झालेल्या ९चिमुकल्यांची आ राजेश एकडे यांनी केली जिल्हा रुग्णालयात जाऊन विचारपूस

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
नांदुराः चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने मलकापूर तालुक्यातील कुंड येथील ९चिमुकल्यांना विषबाधा झाल्याची घटना १७सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली होती
कुंड येथील भाग्यश्री श्रीकृष्ण कांडेलकर वय १२वर्षे,सोहम निनाद तायडे वय १०वर्षे,नम्रता सुरेश बावस्कर ८वर्षे,दिव्या संतोष कांडेलकर १०वर्षे,समर्थ सुरेश बावस्कर वय अडीच वर्षे,वैष्णवी रमेश बावस्कर १०वर्षे,श्रेया रमेश बावस्कर ५वर्षे,रिया सुरेश बावस्कर ६वर्षे आणी श्रेया अशोक कांडेलकर वय ८वर्षे ही बाल गोपाल मंडळी गावाबाहेर खेळत होती या मुलांना प्रसाद म्हणून गावातील महिलेने चंद्रज्योतीच्या बिया दिल्या या बिया खाल्याने सर्व ९मुलांना उलट्या होऊ लागल्याने मुलांनी ही बाब आप आपल्या घरी सांगितली असता पालकांनी त्यांना तातडीने मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथून सर्व मुलांना अधिकच्या उपचारार्थ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले सर्वच चिमुकल्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत १८सप्टेंबर रोजी आमदार राजेश एकडे यांनी जिल्हा रुग्णालय गाठून त्या चिमुकल्यांची आस्थेने विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा करीत उपचाराबाबत सूचना केल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संतोष रायपुरे,भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे बंडुभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती



