देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्यखामगांव विधानसभा मतदार संघात विकास पंधरवाडा अंतर्गत ५ कोटी रुपयांचे भूमिपूजन थाटात संपन्न.

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
खामगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाला भाजपाच्या काळातच गती मिळाली – सागर फुंडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज तिसऱ्या दिवशी मतदारसंघातील ५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन थाटात संपन्न. खामगाव विधानसभा मतदारसंघाला खरी गती भाजपाच्या कार्यकाळात आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात मिळाली असल्याचे प्रतिपादन सागर फुंडकर यांनी आज केले या भूमिपूजन प्रसंगी केले.
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍड आकशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात चौफेर विकास होत आहे खामगाव विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात महाविकास आघाडीने भाजपा आमदारांना कोणताही निधी दिला नाही उलट मंजूर कामे रद्द करण्यात आली. भाजपा आमदाराला कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जनतेचा एक प्रकारे छळच केला. त्यामुळे जनता त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. मागील एक वर्षापासून राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली असून आता महायुती च्या काळात मतदारसंघात कोट्यावधी रुपयाची कामे मंजूर झाली असून अजून कोट्यवधी रुपयाची मंजूर होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघात विकास पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. यांतर्गत ग्रामीण भागातील जवळपास पावले दोनशे कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. तसेच शहरातील जवळपास २५ कोटी रुपयांच्या कामा चे भूमिपूजन येत्या आठवड्याभरात होणार आहेत. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या कार्यकाळात खामगाव विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास होत असल्याचे प्रतिपादन सागर दादा फुंडकर यांनी केले.
यावेळी श्री शरदचंद्र गायकी जिल्हा उपाध्यक्ष ,श्री. डॉ एकनाथ पाटील विधानसभा विस्तारक , श्री सुरेश गव्हाळ तालुकाध्यक्ष, श्री.अंबादास उंबरकार,श्री.रामेश्वर बंड पं.स., शांताराम बोधे सरचिटणीस,श्री.समाधान भाऊ सावळे तालुकाध्यक्ष जेष्ठ नागरिक,श्री.तुळशीराम मानकर ता.उपाध्यक्ष श्री.सदाशिव राऊत ता.उपाध्यक्ष,श्री.नारायण पांढरे ता.सरचिटणीस युवा मोर्चा,श्री.चेतन महाले ता.सचिव युवा मोर्चा,श्री.अनंता शेळके ता.शोशल मिडिया सहसंयोजक, यांची उपस्थिती होती त्याच बरोबर भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नागरिक ,शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख त्या गणातील कार्यकर्ते उपस्थित होते.



