विकास पंधरवाडा अंतर्गत आज दि.18 सप्टेंबर रोजी 7 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन थाटात संपन्ऩ

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
ग्रामीण भागातील विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बॅकलॉक भरुन काढला – आ.ॲड.आकाश फुंडकर
खामगांव देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य़ साधून आज दि.18 सप्टेंबर 2023 रोजी खामगांव मतदार संघातील कोन्टी, मांडणी, नांद्री, काळेगांव बेलखेड, वडजी, कवडगांव, चिंचखेड गावातील 7 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या शुभहस्ते थाटात संपन्ऩ झाले यावेळी बोलतांना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदार संघातील विकास कामांसाठी येणारा निधी थांबवला गेला, परंतु आता पुन्हा राज्यात महायुतीची सरकार आली असून मागील काही महिन्यातच आपण संपुर्ण बॅकलॉक भरुन काढला आहे.
खामगांव विधानसभा मतदार संघ हा एक विकसीत मतदार संघ म्हणून ओळख निर्माण करीत आहे. आज दि.18 सप्टेंबर 2023 रोजी खामगांव विधानसभा मतदार संघातील 7 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र भाजपा सोशल मिडीया सहसंयोजक श्री सागरदादा फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्ऩ झाले. खामगांव विधानसभा मतदार संघातील विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा,समर्पण अभियान अंतर्गत “विकास काम पंधरवाडा” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
मतदारसंघातील डोंगरी भाग समजल्या जाणाऱ्या नांद्री, मांडणी, बोथा कोळी, नांद्री, काळेगांव, वडजी, बेलखेड, कवडगांव, चिंचखेड या आदिवासी बहुल भागातील विकास कामांमध्ये पाणीपुरवठा योजना, मोठे रस्ते, गावातील रस्ते, सभागृह, सभामंडप, स्मशानभूमी, नाल्या , यांचा समावेश असून आज दि.18 सप्टेबर रोजी मतदार संघातील या कार्यक्रमावेळी श्री शरदचंद्र गायकी, डॉ एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, लाला महाले, हरसिग साबळे, भगवानसिंग सोळंके,शांताराम बोधे, डॉ गोपाल गव्हाळे, समाधान मुंढे, संजय ठोंबरे, रतनसिंग परमार, यांचेसह उपरोक्त़ गावातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



