२३ मे च्या वैशाखी पौर्णिमेला ‘भर दुपारच्या वेळी , असेल आकाशात चंद्र-सूर्याची अनोखी खेळी!’ , चक्क चंद्र असेल पायथ्याशी..! शून्य सावली दिवस कार्यक्रमाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
अकोला दि. २२ मे :- वैशाखी पौर्णिमेला म्हणजे येत्या गुरुवारी २३ मे २०२४ रोजी दिवेकर वाचनालय ,पोस्ट ऑफिस जवळ , जठारपेठ ,अकोला येथे , दुपारी ११:४५ ते १२:२५ या वेळेत शून्य सावली दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
“जर असेल आवड तर काढा सवड” शून्य सावली दिवसाचे (ZSD) निमित्ताने विश्वभारती व निशिका या व्दारे या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी आकाश प्रेमीं करिता हि एक अनोखी पर्वणी आयोजित केली आहे तसेच विश्वभारती केंद्र अकोला चे प्रमुख प्रभाकरजी दोड यांनी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस या वृत्त समूहाला भ्रमणध्वनीच्या माध्यमातुन दिलेल्या माहितीनुसार उद्या वैशाखी पौर्णिमा असल्याने चंद्र यावेळी पायथ्याशी म्हणजेच विरुद्ध दिशेने असेल त्यामुळे हाही एक क्षण आकाश प्रेमींना अनुभवता येईल.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणुन मा. प्रकाशजी अंधारे ,अध्यक्ष मा. निखीलेशजी दिवेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विश्वभारती केंद्राचे प्रभाकरजी दोड हे असणार आहेत . इच्छुक आकाश प्रेमींनी या कार्यक्रमाला येतानी वेळेपूर्वी येण्याचे तसेच दुपारची वेळ असल्याने स्वतः ची काळजी घेऊन या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकरजी दोड यांनी केले आहे



