बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी; मोफत नेत्र तपासणी शिबिर…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २१ जून २०२६
मोहनराव नारायण नेत्रालय, नांदुरा व व्हिजन सेंटर, श्री ऑप्टिकल संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रसेवा सहज उपलब्ध व्हावी आणि डोळ्यांच्या आजारांचे वेळेत निदान होऊन उपचार मिळावेत, या उद्देशाने मोहनराव नारायण नेत्रालय, नांदुरा व व्हिजन सेंटर, श्री ऑप्टिकल संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या २२ तारखेला सकाळी ९ ते १ या वेळेत भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या शिबिरामध्ये मोतीबिंदू, चष्म्याचा नंबर, दृष्टीदोष तसेच इतर विविध नेत्रविकारांची तपासणी केली जाणार असून गरजू रुग्णांना अत्यल्प खर्चात उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांसाठी जेवण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था तसेच ये-जा करण्यासाठी वाहन सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. विशेष म्हणजे आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने तपासणी करण्यात येणार असून जर्मन मशिनद्वारे टाका न घेता इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय नामांकित कंपन्यांचे विविध प्रकारचे लेन्स अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा त्यांच्या दारात उपलब्ध होणार आहे. डोळ्यांचे आजार वेळेत ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास अंधत्वासारख्या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला तसेच विद्यार्थ्यांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले असून परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
शिबिराचे ठिकाण एच.डी.एफ.सी. बँक व साई कॉम्प्युटर्सच्या बाजूला, संग्रामपूर येथे ठेवण्यात आले आहे.. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांनी या शिबिरा चा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांसाठी हे शिबिर आरोग्यदायी दृष्टीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button