योग करा,निरोगी रहा चा संदेश; चिखली होमगार्ड पथकाचा सहभाग जागतिक योग दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी:-सलमान पठाण चिखलीदिनांक २१ जून २०२६ (रविवार) आंतरराष्ट्रीय योग दिन चिखली पोलीस स्टेशन व चिखली तालुका होमगार्ड समादेशक कार्यालयाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड श्री. अमोल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील, जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण कार्यालयाचे केंद्र नायक श्री. अरुण परीहार तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. दीपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. भूषणजी गावंडे, तालुका समादेशक श्री. शिवसिंग साळोख, पलटण नायक श्री. विजय खेडेकर, श्री. गजानन वरपे, श्री. समाधान भांदर्गे तसेच कर्मचारी अधिकारी, सैनिक राजेंद्र नरवाडे, संदीप राऊत, सागर चौथे आणि होमगार्ड जवानांनी सामूहिक योगाभ्यास करून योगाचे महत्त्व जाणून घेतले.योग प्रशिक्षक श्री. रवींद्र तवर यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर व मन निरोगी राहते, असा संदेश देत “योग करा, निरोगी रहा” या संकल्पनेनुसार सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या कार्यक्रमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.



