जिल्हा परिषद शाळा पळशी झाशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा!!! तसेच नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री मिलिंद दादा सोनवणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार समारंभ उत्साहात संपन्न!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी, रतन भगत.
(संग्रामपूर) दि.२१/६/२६ सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 21 6 2026 वार रविवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळशी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेत नुकतेच रुजू झालेले आपल्या पंचायत समितीचे गट समन्वयक तथा संग्रामपूर केंद्राचे विद्यमान केंद्रप्रमुख श्री मिलिंद दादा सोनवणे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकिता ताई गिरी ,उपाध्यक्ष मुक्ताताई चितोडे, शिक्षणातज्ञ श्री अभय भाऊ मारोडे, सदस्य श्री दामले आणि सर्व सदस्य जिल्हा परिषद सदस्य श्री भगतसिंग भाऊ पवार, पळशी झाशी गावचे आदर्श महिला सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री श्रीराम भाऊ बांगर, कडू भाऊ बांगर, शेषराव पेंटर, किरण ताई शिरसोले, शोभाताई वानखडे, इत्यादी मंडळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होती.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका डाबेराव मॅडम यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार देशमुख मॅडम यांनी मानले. श्री वाळके सर आणि इतर शिक्षकांनी मुलांना योगासनाचे धडे दिले आणि योगासनाचे महत्त्व पटवून सांगितले. आणि विद्यार्थ्यांना या दिवशी शाळेमध्ये खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. पळशी झाशी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नव्याने रुजू झालेल्या मिलिंद दादा सोनवणे यांच्यामध्ये गावातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच मोठ्या प्रमाणात बदल घडेल असे सुद्धा वक्तव्य करण्यात आले. तसेच यापूर्वी संग्रामपूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत ही शाळा प्रथम आलेली आहे . हि शाळा लवकरच जिल्ह्यात प्रथम येण्यास वेळ लागणार नाही. असे वक्तव्य गावाच्या सरपंच प्रियंका राहुल मेटेंगे यांनी उपस्थितांना संबोधित केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गावातील ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.



