बुलढाणामहाराष्ट्र

शेतकऱ्याने डोक्यात वीट मारल्याने इसम जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : शेजाऱ्याने डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील नागझरी येथे ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुमारास घडली.

हातात वीट घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारली व जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. या घटनेत फिर्यादीच्या डोक्यातून रक्त निघाले. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

घटनेसंदर्भात फिर्यादी बळीराम अशोक मनस्कार (२१)

रा. धानारी ता. मलकापूर ह. मु. नागझरी ता. शेगाव यांनी शहर पो. स्टे. ला दिलेल्या तक्रारीनुसार ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुमारास फिर्यादीने आरोपी कैलास सरदार रा. नागझरी यास त्याने घेतलेल्या उसणे पैशांची मागणी केली असता आरोपीने हातात वीट घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारली व जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

या घटनेत फिर्यादीच्या डोक्यातून रक्त निघाले. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button