नगराध्यक्ष सह नगरसेवक यांच्या निवडीसाठी २९ हजार मतदार आज बजावणार आपला हक्क.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, प्रतिनिधी गजानन खिल्लारे. देऊळगाव राज्यात आज नगराध्यक्ष 21 नगरसेवक निवडीसाठी मतदान . तब्बल नऊ वर्षानंतर होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षासह 21 जागांसाठी आज मतदान होणार असून एकूण 30 मतदान केंद्रावर 60 पोलीस कर्मचाऱ्यासह 283 कर्मचारी सज्ज राहणार आहेत. शहरातील 29 हजार 326 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या दृष्टीने गत 2 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक ऐनवेळी न्यायालयीन कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. नवीन कार्यक्रमानुसार सदर निवडणूक 20 डिसेंबर रोजी मतदान व 21 डिसेंबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर झाला. नवीन कार्यक्रमानुसार आज नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी मतदान होणार असून शासकीय यंत्रणा सज्ज झाले आहे. निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार तर नगरसेवक पदाच्या 21 जागेसाठी 77 उमेदवार रिंगणात आहे. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिये करिता नियुक्त अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी ४, क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक ३, मतदान केंद्राध्यक्ष १३६ यामध्ये मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन प्रत्येकी चार कर्मचारी याप्रमाणे ३४ चमू मध्ये नेमण्यात आले आहे. मतदान केंद्रावर बुर्कादारी महिला ओळखणे करिता ३० महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. अशाप्रमाणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. २८३ पोलीस कर्मचारी तैनात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 30 पोलीस पुरुष कर्मचारी व 30 महिला पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहे या व्यतिरिक्त ३० शिपाई, २७ पी एल ओ असे एकूण २८३ निवडणूक कामासाठी सज्ज राहणार आहे. देऊळगाव राजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क वाजवावा असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश थोरात यांनी केले आहे. दहा प्रभागात ७७ उमेदवाराचे भवितव्य ठरणार. नगरपालिका निवडणुकीत एकूण दहा प्रभात असून प्रभाग 10 मध्ये १ ते ९ प्रभागात प्रत्येकी २ नगरसेवक पदासाठी तर प्रभाग १० मध्ये ३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. नगरपालिकेत निवडून येणाऱ्या 21 पदासाठी ७७ उमेदवाराचे भविष्य आज होणार मतदान प्रक्रिया दरम्यान ठरणार आहे.



