क्राईमगुन्हेगारीमहाराष्ट्र

बोकड चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक व सुटका…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस हरिदास इंदोरे तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद

सुनगाव परिसरामध्ये चोरीच्या घटना सातत्याने घडत असून अशीच एक चोरीची घटना दिनांक 19 जुलै च्या रात्री घडली होती. गावातील गणेश नथू पाटील हे आपल्या परिवारासह चिखलदरा येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी जाण्याच्या अगोदर आपली गुरे ढोरे व बकऱ्या गोठ्यामध्ये बांधून गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी संधीचा फायदा घेत गणेश पाटील यांचे बांधलेले दोन बोकडे चोरून नेले बोकड चोरीची तक्रार गणेश पाटील यांनी दिनांक 20 जुलै जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने सुनगाव बीट जमदार शेख इरफान व त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांनी बोकड चोरी प्रकरण गांभीर्याने घेत बोकड चोरीचा तपास सुरू केला चोरांचा सुगावा लागताच त्यांनी सुनगाव येथील अमोल काशीराम भगत याला अटक केली संबंधित घटनेबद्दल विचारणा केली असता आरोपी अमोल भागवत हा उडवा उडवी चे उत्तर देत होता पोलिसांनी पुलिसगिरी दाखवताच आरोपी अमोल भगत हा कबूल झाला व त्याने त्याचा साथीदार निखिल अशोक पाटील याच्या मदतीने बोकड चोरल्याची कबुली दिली. अमोल काशीराम भगत व निखिल अशोक पाटील या बोकड चोरी प्रकरणातील आरोपींना दिनांक 4 ऑगस्ट रोजी पोलीस नाईक शेख इरफान व त्यांचे सहकारी संदीप रिंढे यांनी अटक केली त्यांच्या विरोधात जाऊन जळगाव जामोद पोलीस स्टेशनला कलम 303(2)3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची समज पत्र देऊन सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गदर्शनात पोलीस नाईक शेख इरफान करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button