सुकळी माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न ; 70 स्पर्धकांचा होता सहभाग

मुक्ताईनगर — तालुक्यातील नवीन माध्यमिक विद्यालय येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेत तालुक्यातील 13 शाळांतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेच्या सुरुवातीस महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच ई.के.टॅलेंट स्कूलचे मुख्याध्यापक अनिल पाटील तसेच नवीन माध्यमिक विद्यालय सुकळीचे मुख्याध्यापक प्रदीप दाणे यांनी बुद्धिबळ खेळून बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन केले.कार्यक्रमास क्रीडा समन्वयक म्हणून संजय वाढे क्रीडा मार्गदर्शक म्हणून ज्ञानदेव येवले आणि किरण भंगाळे यांनी काम पाहिले.स्पर्धेस काशिनाथ धुंदले , मनीष चौधरी, मोबीन सर, कुमारी पुनम बोदडे , तायडे सर, हिवाळे सर, प्रशांत निकुंभे , कृष्णा कोकाटे , बीरलिंगेसर , दीपक पाटील आदी क्रीडा शिक्षकांनी स्पर्धकांसह उपस्थिती दिली.
या स्पर्धा पुढील वयोगटात संपन्न झाल्या असून त्यातील विजयी स्पर्धक
14 वर्ष मुली विजयी संघ —
प्रथम – श्रुती दत्तात्रय फेगडे (जे.ई. स्कूल मुक्ताईनगर )
व्दितीय – सृष्टी सुधाकर मोरे (स्व.निखिल खडसे इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
तृतीय – चैतन्या जितेंद्र कोळी ( आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
चतुर्थ – साक्षी सुनिल पाटील (आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
पाचवी – हेमांगी संजय मोरे
(नवीन माध्यमिक विद्यालय, हरताळे.)
17 वर्ष मुली विजयी संघ
प्रथम :- नंदिनी ज्ञानेश्वर चौधरी(नवीन माध्यमिक विद्यालय, हरताळे.)
व्दितीय – देशना नितीन जैन
(आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
तृतीय – अदित्ती अजय कुलकर्णी (जे.ई. स्कूल मुक्ताईनगर)
चतुर्थ – गौरी दिपक नाईक
(आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
पाचवी – सुजाता अशोक दांडगे ( जे.ई. स्कूल मुक्ताईनगर)
_14 वर्ष मुले विजय मुक्ताईनगर —
प्रथम- पवन शंकर धबाडे
(नविन माध्यमिक विदयालय, हरताळे.)
द्वितीय- चेतन विनोद सुरवाडे
(डॉ.जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
तृतीय- विनय गोपाळ लवांडे
(जे.ई.स्कूल मुक्ताईनगर)
चतुर्थ – आदीत्य अजय शर्मा
(आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
पाचवा – देवांग अनिल पाटील
(एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल, मुक्ताईनगर.)
*वयोगट १७ वर्षे मुले विजयी संघ—
प्रथम – वेदांत पंकज पाटील
(डॉ.जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
द्वितीय- धिरज राजू पाटील
(डॉ.जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
तृतीय – भाग्येश सुमित जैन
(डॉ.जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर.)
चतुर्थ – भाग्येश भुषण जोशी (जे.ई.स्कूल मुक्ताईनगर.)
पाचवा- मोहित गजानन चिखलकर
नविन माध्यमिक विद्यालय, हरताळे
वयोगट 19 वर्ष मुली विजय संघ
प्रथम – भक्ती आशिष भंसाली
(जे.ई.स्कूल,मुक्ताईनगर.)
व्दितीय – हिमांशी प्रकाश पटेल
(जे.ई.स्कूल,मुक्ताईनगर)
तृतीय – अपेक्षा रितेश जैन
(जे.ई.स्कूल,मुक्ताईनगर) असे आहेत सर्व विजयी झालेल्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवीन माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पंच म्हणून अनिल चव्हाण आणि मुकेश जूंबळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर आभार उपशिक्षक दत्तात्रय फेगडे यांनी मानले.



