गर्ल्स हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता. प्रतिनिधी :-विकास आमोदकर
रावेर : सौ. कमलाबाई सुंदरलाल अग्रवाल गर्ल्स हायस्कूल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थिनींना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ‘शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचे तसेच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनीचे प्रशस्तीपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्करदादा काशिनाथ महाजन, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष राजेंद्र आठवले, चेअरमन संतोषशेठ अग्रवाल, सचिव अक्षय अग्रवाल, संचालक विजयलाल लोहार, तुषार मानकर, शैलेंद्रकुमार देशमुख तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका एच. एस. कोल्हे मॅडम, उपमुख्याध्यापक आर. एल. तायडे, पर्यवेक्षक एम. जी. पाटील, माजी मुख्याध्यापिका एन. पी. पुराणिक मॅडम, तसेच विजयशेठ गोटीवाले, किशोरजी तोलानी, अरुणजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. आर. भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन यु. बी. डोळे मॅडम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समिती प्रमुख जी. वाय. चौधरी, पी. व्ही. केदारे मॅडम, एस. एन. महाजन, व्ही. आर. राठोड व आर. के. शिंदे पी व्ही पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला पाठबळ देणारे असे उपक्रम त्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देतात. शिक्षण, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.



