खानदेशजळगावा जिल्हा

१३ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू; मुक्ताईनगरात शोककळा

१३ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू; मुक्ताईनगरात शोककळा

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरातील जे.ई. स्कूलमध्ये सातवीमध्ये शिकणाऱ्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा आज (बुधवार, ३० जुलै) दुपारी अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चैतन्य शंकर मराठे (वय १३, रा. मुंढोळदे, ता. मुक्ताईनगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चैतन्य आपल्या कुटुंबासोबत मुंढोळदे येथे राहत होता आणि दररोज शाळेच्या बसने मुक्ताईनगरमधील जे.ई. स्कूलमध्ये येत असे. आज सकाळी नेहमीप्रमाणे तो शाळेत आला. दुपारच्या सुट्टीत जेवणानंतर मित्रांसोबत खेळत असताना त्याने अचानक त्रास जाणवू लागल्याने बाकावर बसून थोडा वेळ विश्रांती घेतली. मात्र काही क्षणांतच त्याची प्रकृती अधिक बिघडली आणि तो बेशुद्ध झाला.

शाळेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ मुख्याध्यापकांच्या मदतीने त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर चैतन्यला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे.

चैतन्यच्या मृत्यूची बातमी कळताच त्याचे पालक आणि नातेवाईक शाळेत धाव घेत असताना वातावरण हृदयद्रावक बनले. आपल्या चिमुकल्याला मृत अवस्थेत पाहून पालकांनी आक्रोश केला. गावात आणि शाळेत शोककळा पसरली आहे.

ही दुर्दैवी घटना पुन्हा एकदा शालेय आरोग्य तपासणी आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button