खडसे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाद्वारे शिक्षक दिनानिमित्त सेमिनार संपन्न*

* मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाद्वारे शिक्षक दिनानिमित्त
दिनांक ६ सप्टेंबर 2025 रोजी विद्यार्थ्यांचा विविध विषयावर सेमिनार संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य तथा विद्यमान विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र चौधरी होते तर मार्गदर्शक म्हणून विभागातील प्रा. डॉ. संतोष थोरात व प्रा. डॉ. सुरेखा चाटे यांची उपस्थिती होती. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या विषयी असलेल्या आपल्या मनातील भावना मनोगतादवारे व्यक्त केल्या. या कार्यक्रमात कुमारी जया गुरचळ हिने शिक्षक कशा पद्धतीने मार्गदर्शकांची भूमिका बजावतात याचे महत्त्व सांगितले, तर कुमारी नम्रता गोमटे हिने शिक्षक कसे देशाचे चांगले नागरिक घडवितात यावर प्रकाश टाकला. कुमार आर्यन मेढे याने शिक्षकांकडून आम्हाला शिस्त व ज्ञानार्जनाची ऊर्जा मिळते असे आपल्या भाषणात सांगितले. त्यानंतर कुमार ओम चौधरी याने आई-वडील आणि शिक्षक यांचे महत्त्व आपल्या मनोगत विशद केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या साठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. यामध्ये विशेषता: विद्यार्थिनींमधून कुमारी सानिया तडवी हिने ब्लड हा विषय मांडला, कुमारी कीर्ती निंभोरे हिने रक्ताचे कार्य यावर प्रकाश टाकला तर कुमारी पल्लवी पाटील हिने ब्लड सेल्स शीर्षक असलेला विषय सादर केला. त्यानंतर कुमारी साक्षी राठोड हिने प्लाजमा हा विषय मंचावर सादर केला. विद्यार्थ्यांमधून कुमार समीर खान याने हिमोग्लोबिन हा विषय पद्धतशीरपणे सादर केला तसेच सक्षम मोपारी यांनी आरबीसीज आणि डब्ल्यूबीसी या विषयावर कुशलपणे मांडणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीते साठी विभागातील श्री अशोक पाटील, प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



