जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची BBC Sportswoman of the Year 2025 Awards सोहळ्यास उपस्थिती — महिला क्रीडा सक्षमीकरणाला चालना…

नवी दिल्लीकेंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी BBC Sportswoman of the Year 2025 Awards पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून भारतातील महिला खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “महिलांना क्रीडा क्षेत्रात समान संधी दिल्यास देश अधिक उंची गाठतो.” भारतातील महिला खेळाडूंच्या उत्कृष्ट यशाचा गौरव करण्याचा हा सोहळा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनात महिला सक्षमीकरण, क्रीडा विकास, ASMITA लीग तसेच राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 यांसारख्या उपक्रमांद्वारे महिलांसाठी अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक क्रीडा परिसंस्था उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्धार अधिक बळकट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास खासदार राजीव शुक्ला, रंजीत रंजन, राजीव राय, राहुल कसवान, तसेच Jonathan Munro (CEO, BBC News), रूपा झा (CEO, Collective Newsroom), दिलीप तिर्की, लिएंडर पेस, अंजू बॉबी जॉर्ज, दीपा मलिक आणि योगेश्वर दत्त यांच्यासह देशभरातील आघाडीचे खेळाडू, क्रीडा प्रशासक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करत असताना, क्रीडा क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व, आत्मविश्वास आणि यश हे राष्ट्रीय अभिमान व प्रगतीसाठी प्रभावी प्रेरणाशक्ती ठरेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button