Uncategorized

अडीच वर्षाच्या लेकीला कडेवर घेऊन कोमल बाभणीकर यांचा पन्हाळा ते पावनखिंड प्रवास…!!

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : - रिसोड येथील कोमल बाभणीकर यांनी पन्हाळा ते पावनखिंड हा 52 किमी चा आपल्या लेकीला कडेवर घेऊन पायी प्रवास केल्याने कोमल बाभणीकर यांचे कौतुक होत आहे.
 रिसोड येथील रायबा आणि कोल्हापूर येथील स्वराज्याचे शिलेदार यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेचे आयोजन दि. 12,13 व 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते.यामध्ये रिसोड येथील कोमल बाभणीकर यांनी आपल्या चिमुकलीसह सहभाग घेऊन दिनांक 12 रोजी 20 किमी तर दि. 13 रोजी 32 किमीचा पायी प्रवास करून ही मोहीम पूर्ण केली. वाटेने चालत असताना अरुंद पायवाट,सतत पडणारा पाऊस,डोंगर,दरी, घनदाट जंगल,ओढे यांना पार करत आपल्या लेकीला कडेवर घेऊन जय जिजाऊ जय शिवराय या घोषणेसह 52 किमीची ही बिकट आणि खडतर वाट पूर्ण करत ही मोहीम पूर्ण केली.
 यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतिस्थळी कोमल यांचा रायबा ग्रुपचे सर्वेसर्वा विकासजी इरतकर आणि स्वराज्याचे शिलेदारचे रामदासजी पाटील यांनी 'आधुनिक हिरकणी'म्हणून कोमल बाभणीकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.. याबाबत 'आधुनिक हिरकणी' म्हणून कोमल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button