बुलढाणा

किडनीच्या आजाराने इसमाचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

आसलगाव येथील गणेश चिंतामण मेहसरे वय वर्ष 58 यांचा मूत्रपिंडाच्या आजाराने 2 ऑगस्ट रोजी मंगळवार ला मृत्यू झाला. आसलगाव भाग हा संपूर्ण खारपानपट्ट्याने व्यापला असून विहिरीचे पाणी पिण्यास अतिशय अयोग्य आहे. जवळपास 1500 ते 2000 टीडीएस क्षार विहिरीच्या पाण्यामध्ये असल्याने ते अतिशय शरीराला व मित्रपिंडाला घातक असून त्यामुळे किडन्या निकामी होतात. आसलगाव परिसरात संपूर्ण शेतमजूर शेतकरी वर्ग असून 85 ते 90 टक्के लोकांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असल्याने 140 गाव अंतर्गत योजनेचे पाणी असल्यापासून या रोगाला बऱ्याच पैकी आळा बसला आहे. पण या अगोदर शेतातीलच काही विहिरीतील पाणी पिल्यामुळे अनेक नागरिकांना किडनी स्टोनचे आजार व किडनी निकामी होण्याचे आजाराला सामोरे जावे लागले आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वी जर उपाययोजना केल्या असत्या तर या खारपणपट्ट्यातील अनेक लोकांचे प्राण वाचले असते. त्यांच्या पश्यात पत्नी भाऊ व बराच असा मोठा परिवार आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button