पिंपळगाव काळे जि.प.केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी: प्रशांत चव्हाण
जळगाव (जा) : दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जि.प.केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री . लाला भाऊ मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वज सलामी देऊन राष्ट्रगीत,राज्यगीत व भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले.
तसेच शालेय विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली, त्यानंतर ,”जलवा जलवा” या देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्य सादर केले.
सर्व विद्यार्थी व शिक्षक यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली आणि ग्रामपंचायत वर ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत वरही विद्यार्थ्यांनी जलवा जलवा या गाण्यावर लेझीम नृत्य सादर केले. त्याचे गावकऱ्यांनी तसेच इतर शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी खूप खूप कौतुक केले.
ग्रामपंचायत वरील कार्यक्रम संपताच सर्व मुलं शाळेत आली त्यानंतर भाषणाचा कार्यक्रम झाला मुलांना गोड व छान खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सर्व कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुरडकर सर केंद्रप्रमुख ठोंबरे सर,सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी,आणि शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.



