रमजीपूर ता. रावेर येथे डोळे तपासणी शिबिर संपन्न !

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस
ता प्रतिनिधी विनोद तायडे
रमजीपुर ग्रामपंचायत येथे दहा (१०) सप्टेंबर रोजी गणपती नेत्रालय रावेर मार्फत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले व डोळ्यांची विविध प्रकारची तपासणी करण्यात आली जसे की डोके दुखी/डोळे चुळचुळ करणे/ डोळे लाल होणे/ सुईचे बारीक नाके कमी दिसणे व शिबिरा मध्ये मोतीबिंदू तपासणी करण्यात आली ही सर्व तपासणी जापानी कंप्युटर द्वारे करण्यात आली तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही गणपती नेत्रालय रावेर येथे करण्यात येणार आहे सदर शिबिरा मध्ये गावातील एकशे पसतीस (१३५) रुग्णांनी तपासणी केली व ज्या .ज्या . लोकांना चष्म्याची आवश्यकता आहे अशा लोकांना लवकरच कमी खर्चा मध्ये घरपोच सेवा दिली जाणार आहे तरी या शिबिराचे उद्घाटन रमजीपुर गावचे सरपंच विनोद शिवराम तायडे यांच्या हस्ते करण्यात आले व ग्रामपंचायत ग्रामसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले तरी या शिबिरा मध्ये तपासणी साठी आलेले डॉ शांताराम पाटील
डॉ गणेश पाटील
अनिल पवार
पवन सोनार
तसेच ग्रामसेवक : मज्जित तडवी
उपसरपंच : योगिता कावडकर
सदस्य : प्रतिभा महाजन
सदस्य : ममता तडवी
ग्रा शिपाई: विनोद निंभोरेकर
तसेच ग्रामस्थ मंगल कावडकर , सुधाकर महाजन, साहेबराव महाजन, नत्थु तडवी इत्यादी होते



