खानदेशजळगावा जिल्हा

जे ई स्कूल आणि ज्यु.कॉलेजमध्ये शिक्षकदिन साजरा :- (तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की आज दि.4/9/25 गुरुवारी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षकदिना निमित्त सर्व शाळेची जबाबदारी विद्यार्थी शिक्षकांनी सांभाळली.प्रार्थना,परिपाठ तसेच सर्व अध्यापनाचे कार्य विद्यार्थ्यांनीच केले तसेच आज शिक्षकदिनी शाळेच्या प्राचार्यपदी कुमारी आदिती रेदासनी,उप प्राचार्य स्वरा पाटील,पर्यवेक्षक सर्वेश जंगले,नंदिनी पाटील यांनी कार्यभार सांभाळला तसेच इतर 75 विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे तसेच उत्साहाने अध्यापन केले आणि वर्गातील विद्यार्थ्यांनी अध्ययनाला खूप प्रतिसाद दिला.
शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य व्ही.एम.चौधरी सर आदिती रेदासनी,वंदना शिर्के,स्वरा पाटील,राठोड सर,कवडे सर यांच्या हस्ते करण्यात आले
कु.आदीती ने विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व याविषयी विचार मांडताना शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन कसे घडवतात,त्यासाठी किती कष्ट घेतात, मार्गदर्शन करतात म्हणून शिक्षकांच्या आभारासाठी सुंदर कविता पर गीत सादर केले
तसेच प्राचार्य व्ही एम चौधरी सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी आयुष्यभर झटत असतो तसेच विद्यार्थ्यांमध्ये कधीही जाती,धर्म,भाषा यामध्ये भेदभाव करत नाही आणि आपला विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत असतो असे सांगितले यावेळी योगीता पाटील,संदीप धनके व्हि.डी.पाटील अंजू पाटील माधुरी पाटील या विद्यार्थ्यांच्या मनातील आदर्श शिक्षकांची नावे प्राचार्यांनी जाहीर केली
सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी समिती अध्यक्ष व्हि.डी.पाटील, आर.व्हि.महाजन बी.एम.कोल्हे एस.एम.वाढे तसेच इतर सर्व शिक्षक बंधू भगिनींनी प्रयत्न केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button