दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ चिखलीत कडकडीत बंद; महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद*

व्यापारी, व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने ठेवली दुकाने बंद; वंचित बहुजन आघाडीसह विविध आंबेडकरी संघटनांचा शांततापूर्ण मोर्चा
चिखली (प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला आज गुरुवार, दि. २३ जुलै रोजी चिखली शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिल्ली येथील जंतरमंतरवर शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ चिखलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. चिखली शहरातील व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक संघटना व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
वंचित बहुजन आघाडीचे चिखली शहराध्यक्ष बाळू भिसे यांच्या पुढाकारातून निघालेल्या मोर्च्यात शहरातील विविध संघटनांनी मुख्य मार्गावरून शांततापूर्ण मोर्चा काढत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असून, या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी हा बंद पुकारण्यात आला होता.
चिखली शहरात बंद पूर्णपणे शांततेत, शिस्तबद्ध व संविधानिक मार्गाने पार पडला. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला नैतिक



