जळगावा जिल्हा
मा. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा उपमुखयमंत्री राहिलेले अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ ला काटेवाडी ता. बारामती येथे झाला . ते १९८२ पासून राजकारणात सक्रिय झाले . जून १९९१ ला ते खासदार म्हणून निवडून आले मात्र सप्टेंबर १९९१ ला आमदार म्हणून निवडणूक लढविली व तेंव्हा पासून ते आमदार म्हणून निवडून आले. ते सर्वाधिक वेळा म्हणजे ५ वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले . ते महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहिले . राजकारणी लोकांमध्ये सर्वाधिक सक्रिय असलेले , कामांचा पाठपुरावा करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती .
त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड पोकळी निर्माण झाली .
मा. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली .
जयसिंग वाघ
जळगाव.



