शिवसेनेचे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी व कामगारांच्या समस्यांबाबत निवेदन

(शिवसेना प्रणित किसान सेनेचा पुढाकार)
खामगांव |
दि. २७ जानेवारी २०२६
प्रतिनिधी. राजेंद्र मुंढे. खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी, शेतमजूर, हमाल कामगार व व्यापारी बांधव यांच्या विविध प्रलंबित व गंभीर समस्यांबाबत आज शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती/सचिव यांना निवेदन सादर करण्यात आले. खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी व नामांकित बाजार समिती असून दररोज हजारो पोत्यांची आवक येथे होत असते. मात्र बाजार समितीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, शेडची मोडतोड, परिसरातील मोठमोठे खड्डे व उखडलेला भाग यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धुळीमुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून वाहनांचे अपघातही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पुढील प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या -बाजार समितीतील रस्ते, शेड व संपूर्ण परिसर तात्काळ दुरुस्त करून खड्डे बुजवावेत.
शेतकरी बांधवांसाठी सुरू असलेली परंतु सध्या बंद असलेली शिदोरी योजना त्वरित सुरू करण्यात यावी. कॉटन मार्केट यार्डमध्ये सुरक्षा व्यवस्था बळकट करून सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी.
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी. गुरुवारी भरणाऱ्या ढोर बाजारात पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच गुरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार आधार कार्ड व अधिकृत पावतीवरच करण्यात यावेत. आठवड्यातून किमान दोन वेळा संपूर्ण बाजार समितीची नियमित साफसफाई करण्यात यावी.मंगेश चोपडे, राजू निमकडे, लक्ष्मण काकडे, प्रभाकर बघे, मारुती जसताप, पंजाब टाकस, सौ. ज्योतीताई भुजाडे, सौ. कल्पनाताई गायगोड, सौ. श्वेता पाटील, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे, योगेश देशमुख, अमोल बगाडे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विशाल साटोटे, अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख मयूर खंडारे, तसेच शिवसेनेचे आशिष लांडगे, निलेशदेवताडू, शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर, राहुल ठोंबरे, शहर संघटक उमेश तायडे, उपशहर प्रमुख करण छापरवाल, विभाग प्रमुख नारायण टीकार, चेतन शलकर, गोपाल शेळके, विजय भगत, निलेश फुंडकर शंकर गव्हाळे आदित्य पांढरे, अनुप गायकवाड, यांच्यासह खामगांव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, किसान सेना, कामगार सेना यांचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथ प्रमुख तसेच असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



