खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

एक होमगार्ड – एक झाड’ संकल्पाने रावेर होमगार्ड पथकाचा पर्यावरण संवर्धनाचा निर्धार

कांतीलाल तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; रावेर होमगार्ड पथकाचा हरित संदेश

रावेर | प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर होमगार्ड पथकाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘एक होमगार्ड – एक झाड’ या उपक्रमांतर्गत सरदार जी. जी. हायस्कूलच्या मैदानावर रविवारी साप्ताहिक कवायतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी तालुका समादेशक कांतीलाल तायडे यांच्या वाढदिवसानिमित्तही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वृक्षारोपणाचे पर्यावरणीय व सामाजिक महत्त्व उपस्थित होमगार्ड जवान व पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले. प्रत्येकाने झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पद्माकर महाजन यांनीही वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

तालुका समादेशक कांतीलाल तायडे यांनी प्रत्येक होमगार्डने आपल्या शेतात, प्लॉटमध्ये किंवा उपलब्ध जागेत किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. ‘एक होमगार्ड – एक झाड’ ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संदीप पाटील, एपीआय तुषार पाटील, रावेर शिक्षक संवर्धन संघाचे अध्यक्ष देवेंद्र मिसर, संचालक तुषार मानकर, मोहन महाजन, पांडुरंग पाटील, दिनेश महाजन, किरण शेलोळे, मोहन शिंदे, मोहित बिरपण, प्रवीण पवार, महिला होमगार्ड लता सोनार यांच्यासह मोठ्या संख्येने होमगार्ड जवान व पदाधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button