केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी लोणार सरोवरात स्वच्छता मोहीम…. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती उपक्रम….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे
केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद आणि वरवट बकाल मा. डा. किशोर जी केला सर व जळगाव जामोद विभागाच्या मुख्य संयोजिका सौ स्वाती किशोर केला मॅडम, तसेच शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे, प्राचार्य विनोद ईश्वरे प्राचार्य योगेश घाटोळे, प्राचार्य राजेश लोहिया, यांच्या संकल्पनेतून इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील लोणारच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराची ओळख करून देण्यासाठी दि 11. जानेवारी 2025 रोजी शाळेच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी या पर्यावरण जनजागृती उस्फुर्तनेपणे सहभाग दर्शविला.. सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद आणि वरवट बकाल येथील 600 च्यावर विद्यार्थी व जवळपास 100 शिक्षकासह लोणार सरोवर पाहण्यासाठी शाळेच्या 16 स्कूल बसेस हा प्रचंड असा ताफा लोणार ला पोहोचला. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा अर्बन परिवाराकडून एक अद्यावत ॲम्बुलन्सची सुविधा करण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात अतिशय शिस्त आणि शांततेत लोणार सरोवराच्या ऐतिहासिक वारसा जाणून घेतला.. यादरम्यान विद्यार्थ्यांना लोणारच्या सरोवरची भौगोलिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक, आणि शास्त्रीय माहिती देण्यासाठी या ठिकाणी संस्थेने पाच, गाईडची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी गाईडने दिलेल्या सर्वच माहिती अवलोकन करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोंदी करून घेतल्या.11 जानेवारी पहाटे पाच शाळेतून लोणार सरोवरासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांनी मार्गातील सुलतानपूर येथील सहकार विद्या मंदिराला भेट देऊन या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला.. तर प्रतीच्या प्रवासामध्ये हिवरा अश्रम येथील पूजनीय सुखदास महाराजांच्या आश्रमाला भेट आश्रमातील विविध सोई सुविधा तसेच आश्रमाचा इतिहास जाणून घेतला. बुलढाणा अर्बन परिवारातर्फे विद्यार्थ्यांसाठी उत्तम अशा भोजनाच्या व्यवस्था प्रतीच्या प्रवासादरम्यान करण्यात आली. अतिशय शिस्त आणि शांततेत संपन्न झालेल्या सहलीसाठी शाळेतील पर्येंक्षिका तसेच शिक्षक शिक्षकेत्वर कर्मचारी अथक परिश्रम घेतले. शैक्षणिक सहलीचा विद्यार्थ्यांनी भरपूर मनमुराद आनंद लुटला…✍️



