Uncategorized
एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । तालुक्यातील खेर्डा शिवारातील नारायण गावंडे यांच्या शेतातील धुन्ऱ्यावरील निबांच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना काल ३ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला व मृतकाचा फोटो सोशल
मिडीयावर व्हायरल केला. त्या आधारे मृतकाची ओळख पटविण्यात आली असून मृतक अनिल साहेबराव अवचार (२८) निवाणा ता. संग्रामपूर येथील रहिवासी असल्याचे समजले.
याप्रकरणी खेर्डा येथील पोलिस पाटील श्रीधर भारसाकळे यांनी जलंब पो.स्टे.ला फिर्याद दिली. त्यावरून जलंब पोलिसांनी कलम १९४ भान्यासंनुसार मर्ग दाखल केला आहे.



