Uncategorized

शेगाव येथील गुरांच्या बाजाराला शेतकऱ्यांचा प्रतिसाद,बाजारात आली दीड लाखाची बैल जोडी विक्रीस

शेगाव येथील गुरांच्या बाजाराला शेतकऱ्यांचा प्रतिसाद,बाजारात आली दीड लाखाची बैल जोडी विक्रीस.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव17 जानेवारीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती शेगावच्या वतीने, स्वर्गवासी गजानन दादा कॉटन मार्केट यार्ड येथे गुरांचा बाजार सुरू केला आहे. पंच क्रोशितील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद या बाजाराला मिळत आहे, मागील आठवड्यामध्ये एक लाख वीस हजार किमतीची, बैल जोडी या बाजारात विकण्यात आली.आज दिनांक एकवीस फेब्रुवारी मंगळवारी रोजी शेगाव येथील गुरांच्या बाजारात, एक लाख 40 हजार व एक लाख 60000 किमतीची बैल जोडी, या आठवड्यातील बाजाराची आकर्षण ठरली असून, भविष्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून शेगाव येथील गुरांचा बाजार ओळखल्या जाईल, अशी प्रतिक्रिया सुद्धा बेपारी व शेतकऱ्यांनी यावेळी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सर्व सुख सुविधा येथील बाजारात उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन बाजार समितीचे विनोद पुंडकर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button