खानदेशजळगावा जिल्हाशैक्षणिक

डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालयातर्फे नगरपरिषद फैजपूर येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालयातर्फे नगरपरिषद फैजपूर येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

फैजपूर : फैजपूर गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभवासाठी आलेल्या डॉ.उल्हास पाटली कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. यानिमित्ताने कृषिकन्यांनी नगरपरिषद फैजपूर व ग्रामीण परिसरात स्वछता अभियान राबवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी भारती बोके मॅडम (टी.टी.समन्वयक) व दिनेश तेजकर (लेखी सहायक) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच गावकर्‍यांचे सहाय्य लाभले.डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव येथील कृषीकन्या वैशाली रोडे, सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांनी स्वच्छता अभियानात उस्फुरतेने सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम २०२३ – २०२४ या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञांच्या मार्गदर्शना खाली पार पडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button