महाराष्ट्रविदर्भसामाजिकसांस्कृतिक

रामनवमी उत्सवानिमित्त दोन दिवस महाप्रसाद श्री गजानन सेवा समितीचा उपक्रम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री राम नवमी निमित्त संतनगरीत येणाऱ्या भाविकांसाठी २९ व ३० मार्च असे दोन दिवस महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. स्थानिक माहेश्वरी भवन येथे श्री गजानन सेवा समिती, नागपूर, अकोट व शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.मागील अनेक वर्षांपासून श्री गजानन सेवा समितीच्या वतीने प्रकटदिन रामनवमी व ऋषिपंचमी या ‘श्रीं’च्या मंदिरात पार पडणाऱ्या तीन्ही उत्सवकाळात संतनगरीत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद वितरणाचे सेवाकार्य केले जाते. पादत्राणे ठेवण्यापासून तर महाप्रसाद वितरणाची पध्दत ही श्रींच्या मंदिराचे एकप्रकारे हुबेहुब प्रत्यंतर असल्यासारखे सेवा समितीच्या कार्यपध्दतीत पदोपदी जाणवते. त्यामुळे महाप्रसाद वितरणाच्या जागी नेहमी प्रसन्न वातावरण राहते. सकाळी ६ वाजतापासून अखंडपणे मध्यरात्री शेवटचा भाविकभक्त येईपर्यंत महाप्रसादाचे वितरण सुरू असते. दररोज हजारो भक्त येथील महाप्रसादाचा लाभ घेतात विशेष म्हणजे श्री गजानन सेवा समितीकडून कोठेही या सेवाकार्याचा उहापोह केला जात नाही. तरी उत्सवासाठी येणाऱ्या व पंचक्रोशितील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button