Uncategorized

आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये गेले असता कुलूप उघडण्यात आले

केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी पंचायत समितीला कुलूप ठोकले होते त्या अनुषंगाने आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये गेले असता कुलूप उघडण्यात आलेले होते परंतु एक सत्ताधारी आणि मंत्री असणाऱ्या लोकप्रतिनिधींना हे शोभत नाही यापुढे जर असा पायंडा त्यांनी पाडायला सुरुवात केली असेल तर आम्ही सुद्धा या प्रकारे कुलूप ठोकणार असा इशारा त्यांनी दिला आहे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माहिती घेतली असता गटविकास अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे समजते त्यांच्या जागी नवीन गटविकास अधिकारी यांची नियुक्ती झाल्याचे त्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले परंतु नवनियुक्त गटविकास अधिकारी कार्यालयाची वेळ साडेनऊ वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहणे अपेक्षित असताना नवनियुक्त गटविकास अधिकारी हे अकरा वाजे नंतर कार्यालयात पोहोचले अशा लेट लतीफ अधिकाऱ्याचे आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गांधीगिरी पद्धतीने फटाके फोडत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अशाप्रकारे स्वागत बघून मात्र नवनियुक्त गटविकास अधिकारी यांच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णता उडालेला दिसला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button