अकोलामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

आदिवासी शेतकऱ्यावर अत्याचाराचा आरोप; अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अकोला | प्रतिनिधीबार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत आदिवासी समाजातील अल्पभूधारक शेतकरी वासुदेव नामदेवराव सोळंके यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. या प्रकरणात अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनानुसार, राजंदा येथील रहिवासी वासुदेव सोळंके यांची पाटखेड शिवारातील शेती सर्वे क्रमांक ४४६ असून, शेजारील सर्वे क्रमांक ४४३ मधील शेतमोजणीदरम्यान २०१८ मध्ये पाच गुंठे क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अनेक वेळा महसूल विभागामार्फत मोजणी करण्यात आली. मात्र, संबंधित जमीन वाद कायम राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.३ जुलै २०२६ रोजी महसूल विभागाच्या उपस्थितीत फेरमोजणी सुरू असताना विरोधी पक्षातील काही व्यक्तींनी मोजणीला विरोध करत अर्जदार व त्यांच्या पत्नीला मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही असल्याचा दावा अर्जदाराने केला आहे.या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनेही या प्रकरणात प्रशासनाची भेट घेण्यात आली. संघटनेचे आकाश शिरसाट यांनी, “आदिवासी समाजातील अल्पभूधारक कुटुंबावर अन्याय होत असून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा दिला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते मयूर काळे, बाबू हिरोडे, सम्यक डोंगरे तसेच आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button