बुलढाणामहाराष्ट्र

आज आठी निमित्त जेष्ठा गौरी आवाहन ! परंपरेनुसार अनेकांच्या घरी आकर्षक देखावे सजवून ज्येष्ठा गौरीची स्थापना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी -विजय घोडे

हिवरखेड/तेल्हारा.दि ०५ :- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये ज्येष्ठागौरीचे पारंपरिक पद्धतीने अनेक भाविकांच्या घरी ज्येष्ठा गौरी आवाहन मोठ्या थाटात होते. विविध पद्धतीने पूजा अर्चना करून ज्येष्ठा गौरीची स्थापना होते. त्यामुळे सर्वीकडे भक्ती भावाचे वातावरण निर्माण होते.हिवरखेड येथील सतिष देविदास राऊत यांच्या घरी सुद्धा आठी या निमित्याने गौरी विराजमान होतात. अनेक भाविकांच्या घरी ५० वर्षाहून जास्त कालावधीपासून ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते शहर व ग्रामीण भागात ज्येष्ठा गौरी आवाहन व पूजनाची अनेक वर्षाची परंपरा आहे या परंपरेनुसार अनेकांच्या घरोघरी आकर्षक देखावे सजवून ज्येष्ठा गौरीची स्थापना करुन आवाहन करण्यात येते.
ज्येष्ठा गौरीचा उत्सव हा तीन दिवसाचा उत्सव असतो पहिल्या दिवशी आवाहन व स्थापनाकेली जाते. दुसऱ्या दिवशी पूजा अर्चना व महाआरती अनेक प्रकारचे नैवेद्य दिव्या आरत्या लावून महापूजा केली जाते दुपारी बारा वाजता तर कुठे सायंकाळी एकाच वेळी सर्व ठीक ठिकाणी ही महापूजा व महाआरती पार पडते त्यानंतर महाप्रसाद वितरित केला जातो तिसऱ्या दिवशी सायंकाळी जेष्ठ गौरीचे विसर्जन केले जाते या तीन दिवसाच्या उत्सवाला शनिवार पासून प्रारंभ झाला असुन आठीलाच सप्तश्रुंगी मातेचा सुद्धा उत्सव असतो त्यामुळे या तीन दिवसात सप्तश्रुंगी मातेचा उत्सव आणि ज्येष्ठा गौरी उत्सव असा दुहेरी भक्ती भावाचा उत्साह दिसून येतो ज्येष्ठा गौरी उत्सव हा फक्त घरगुती स्वरूपात साजरा केला जात असुन उत्साहा दरम्यान अगदी काटेकोर पवित्र पाळले जाते त्यामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. आज सर्वत्र परंपरे नुसार जेष्ठा गौरीचा दुसरा दिवस भक्ती भावाने साजरा होत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button