बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगांव जुगारावर उपविभागीय पोलीस अधिकारी, पथकाचा छापा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव शहरातील बाळापूर रोडवरच्या आनंद सागर परिसरातील भक्त निवास जवळील विठ्ठल मेहंगे यांचे घरामध्ये सुरू असलेल्या जुगारावर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकाने छापा मारला असता १० जणांना जुगार खेळतांना पकडले. त्यांचे ताब्यातून ३ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्रीदरम्यान घडली.

याबाबत शेगाव पोलीस स्टेशनला पोउपनि मनोज विलासराव वासाडे वय ३३ वर्ष, बाचक उप.वि.पी. अ. कार्यालय

खामगाव यांनी फिर्याद दिली की, विठ्ठल पंजाबराव मेहेंगे वय २८ वर्ष रा. आनंद सांगर जवळ, हॉटेल भक्त निवास जवळ शेगाव यांचे बंद घरात हा जुगार सुरू होता.) त्यांचेसह देवानंद पंजाबराव मेहेंगे वय २६ वर्ष रा. आनंद सागर जवळ, हॉटेल भक्त निवास हॉटेल भक्त निवास जवळ शेगाव, साजन उर्फ लखन मनोहर पीवाल वय ३३ वर्ष रा. रामदेवबाबा नगर शेगाव, संजय पुंजाजी हिवराळे वय ३५ वर्ष रा. घुइ ता. शेगाव योगेशर बाबुराव इंगळे वय ४५ वर्ष रा. टाकळी विरो ता शेगाव, धनजय विश्वनाथ बोर्डे वय ४२ वर्ष रा. आम्रपाली नगर शेगाव, विनोद राजाराम घुले वय ४२ वर्ष

रा. नागझरी रोड धनगरपुरा शेगाव महेश वासुदेव पटोकार वय ४० वर्ष रा. एसबीआय कॉलनी शेगाव, श्रीकृष्ण भीमराव पवार वय ६० वर्ष रा. आरोग्य कॉलनी, शेगाव, रघुनाथ श्रीराम रोठे वय ५८ वर्ष रा. मोदी नगर शेगाव यांना एक्का बादशाह नावाचा जुगार पैशांचे हारजितवर खेळतांना पकडले. त्यांचे ताब्यातून नगदी ५६, ५००, ९ मोबाईल हँडसेट किंमत १ लाख ५१ हजार, दोन मोटर सायकली किंमत १ लाख ५० हजार असा एकूण ३ लाख ५७ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम १२ अ मुंजूका प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button