महाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील डॉ.अग्रवाल यांच्या घरी ऐन दिवाळीला चोरी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे

हिवरखेड/तेल्हारा दि.१४:-
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील नामांकित डॉक्टर एम. बी.अग्रवाल हे दिवाळीनिमित्त आपला मोठा मुलगा अमित यांच्याकडे पुणे येथे गेले असता दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून कुलूप बंद अवस्थेत असलेले ओढलेले द्वार दिसून आले. तसेच घरा मागील दरवाजा बाहेरून कडी बंद करून लावलेला दिसून आला. त्यामुळे डॉक्टर अग्रवाल यांच्या येथे घरफोडी झाल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ डॉक्टर अग्रवाल यांना फोनवर माहिती दिली. सोबतच डॉक्टर अग्रवाल यांचे हिवरखेड येथील नातेवाईक, निकटवर्तीय, आणि मित्र परिवारातील परिचित व्यक्तींना सुद्धा बोलावून घेतले. निकटवर्तीयांनी तात्काळ हिवरखेड पोलिसांना माहिती दिली असता. पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर, महादेव नेव्हारे, गिरीधर चव्हाण यांचे सह पोलीस ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांसह शेजारी व निकटवर्तीयांनी कडी उघडून घराची पाहणी केली असता घरातील मोठे लोखंडी कपाट, आलमारी फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. ज्वेलरीचे अनेक खाली बॉक्स फेकलेले होते. लोखंडी कपाट, अलमारीचे लॉकर फोडून सुद्धा ऐवज लांपास केलेला जाणवत होता. घटनास्थळाची पाहणीवरून डॉक्टरच्या घरातील लक्षावधी रुपयांच्या वर मुद्देमाल चोरीस गेल्याचे प्रथमदर्शनी सर्वांनाच वाटत होते. पोलिसांनी तात्काळ परिसरातील गजानन महाराज मंदिरसह काही ठिकाण चे सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरु केले आहे. सोबतच फिंगर प्रिंट तज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर अग्रवाल आपल्या पत्नीसह पुणे इथून निघाले बुधवारी सकाळी ते घरी पोहोचतात तोच हिवरखेड पोलीस पुन्हा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सविस्तर पंचनामा केला. शेजारील व्यक्तीकडून सुद्धा इत्यंभूत माहिती जाणून घेतली. त्यानंतर विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर अग्रवाल यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन गाठून आपल्या घरी घरफोडी होऊन रोख वीस हजार रुपये नगदी चोरी गेल्याची फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
डॉक्टर अग्रवाल हे समयसूचकता बाळगून घरी कोणतेच सोन्या चांदीचे दागिने अथवा मोठी रोख रक्कमेची जोखीम जवळ ठेवत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये आणि रोख रक्कम नियमित बँकेत जमा करत असल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचेही यावेळी त्यांनी पोलिसांना सांगितले. जर त्यांनी समय सूचकता बाळगली नसती तर मोठ्या स्वरुपाची चोरी झाली असती अशी परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button