अपघात
अनोळखी 35 वर्षीय इसमाचा रेल्वेने कटून मृत्यू

अनोळखी 35 वर्षीय इसमाचा रेल्वेने कटून मृत्यू
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव
प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगाव | रेल्वेने कटुन अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना येथील रेलवे मार्गावर उघडकीस आली. एका अनोळखी ३५ ते ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह काल रेल्वे पटरीवर दिसून आला. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मृतक अनोळखी इसमाची उंची पाच फूट पाच इंच, रंग काळा सावळा, केस काळे, मिशी काळी, बारीक शरीर बांध मजबूत, अंगात काळ्या रंगाची जीन्सची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचाटी-शर्ट त्यावर लायनिंग असे वर्णन आहे. सदर वर्णनाचे इसमाला कोणी ओळखत असल्यास त्यांनी शेगाव रेल्वे पोलिस स्टेशनचे तपासी अंमलदार पोलीसहेडकॉन्स्टेबल भास्कर दामोदर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे



