मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक उत्साहात संपन्न

दि. २१ फेब्रुवारी २०२६ | मुक्ताईनगर | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हाध्यक्ष मा. शमिभाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष मा. दिलीप पोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह, मुक्ताईनगर येथे आज दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीची सविस्तर आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीत संघटनात्मक आढावा घेत तालुक्यातील बूथनिहाय रचना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. सदस्य नोंदणी अभियान गतिमान करणे, गावपातळीवरील जबाबदाऱ्या निश्चित करणे, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नियोजन आखणे याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावात पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी विशेष जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला .
🔹 जिल्हाध्यक्ष मा. शमिभाताई पाटील यांचे मार्गदर्शन
जिल्हाध्यक्ष मा. शमिभाताई पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिस्त, सातत्य आणि तळागाळातील संवाद अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाची ताकद वाढवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
🔹 जेष्ठ मार्गदर्शक समाधान गवई यांचे मार्गदर्शन
जेष्ठ मार्गदर्शक समाधान गवई यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्यासाठी संघटनात्मक एकजूट आणि निष्ठा महत्त्वाची आहे. गावागावात जाऊन सर्वसामान्यांशी थेट संपर्क साधा आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस जेष्ठ मार्गदर्शक समाधान गवई, जेष्ठ मार्गदर्शक एस. एस. तायडे सर, तालुका महासचिव संजय धुंदले, कोषाध्यक्ष वसंत लहासे, संघटक रविंद्र चव्हाण, संजय म्हसाने, वसंत धुंदले, महेंद्र शिसोदे, भागवत चव्हाण, मनोज पोहेकर, विनोद सुरवाडे, रमेश वानखेडे, महेंद्र शेजवळकर, पंडित महाले, गौतम सपकाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹 तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर यांचे प्रतिपादन
“वंचित बहुजन आघाडी ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर तालुक्यात संघटन विस्तार करून प्रत्येक गावात भक्कम उभारणी करण्यात येईल,” असे तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर यांनी नमूद केले.
बैठकीचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला असून, येत्या काळात तालुक्यात व्यापक जनसंपर्क अभियान, सदस्य नोंदणी शिबिरे व कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.



