बुलढाणामहाराष्ट्र

डॉ.अण्णा भाऊ साठे स्मारक सौंदरीकणाला आठ दिवसात सुरवात करा. अन्यथा आत्मदहण करू :गोपाल तायडे.

स्मारक हटविण्याचे पालिका षडयंत्र करीत असल्याचा ही आरोप .

स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
ऋषिकेश देठे

शेगाव:
शहरात साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक 1993 आगोदर पासून अस्तित्वात आहे. तीस पस्तीस वर्षा पासून एखाद्या महापुरुषा शहरात स्मारक होत नाही. ही खूप खेद जनक बाब आहे. एखाद्या स्मारकाच सौंदर्यकरण होत नसेल तर त्या माघे दोनच करण असू शकतात आणि बाकी सर्व कारना करिता नगर परिषद सक्षम असते. एक कारण म्हणजे राजकीय दबाव व दुसरे म्हणजे स्मारका जवळील भौगोलिक परिस्तिथी. डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारका जवळील भौगोलिक परिस्तिथी सौंदरीकरण करण्या करिता उजवी आहे.तरी सुद्धा तीन दशका पासून स्मारकाचे सादरीकरण उपेक्षित ठेवणायत येत आहे. नगर परिषद प्रशासनाला डॉ. अण्णा भाऊ साठे मान्य नाही आहे का.? त्यांच्या क्रांतीकारी कार्याला प्रशासनाला विसर पडला का. डॉ. अण्णा भाऊं साठे यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले. संयुक्त महारष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या क्रांतिकारी लिखानातुन व कलापथकाच्या माध्यमातून घरोघरी पोहचवली आणि त्या मुळेच संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. त्यांचे साहित्य साता
समुद्रा पार पोहचले महारष्ट्रा समेत देशाचा गौरव वाढविला. त्यांचे साहित्य 17 भाषेत अनुवादित आहेत.
त्यांच्या कार्याची यादी खूप मोठी आहे. परंतु या कार्याला नगर परिषद विसरलेली दिसते.
नगर परिषदेने द्वेष भावना मोडून, राजकीय दबाव झूगारून साहित्यरत्न लोकशाहिर डॉ अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यकरणा च्या कामाला येत्या आठ दिवसात सुरवात करावी अन्यथा साहित्य रत्न डॉ. अण्णा भाऊ साठे स्मारक
सौंदर्यकरण करण्या करिता आत्मदहन करू असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष तथा मातंग समाजाचे युवा कार्यकर्ते गोपाल तायडे यांनी नगर परिषदेला दिला असून. होण्याऱ्या सर्व परिस्थितीला नगर परिषद जबाबदार राहील असे ही त्यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button