बुलढाणामहाराष्ट्र

महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

*:-अनिल गावंडे*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे:-लोकजागर मंचच्या वतीने तेल्हारा शहरात प्रथमच आयोजीत करण्यात आलेल्या भव्य तेल्हारा जत्रा महोत्सवात महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे उदगार तेल्हारा येथील पत्रकार परिषदेत लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री अनिल गावंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.यावेळी लोकजागर मंच्याच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला लोकजागर मंचचे तेल्हारा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.अनिल गावंडे पुढे बोलतांना म्हणाले की महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला वाव व योग्य बाजारपेठ तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी या तेल्हारा जत्रेचे आयोजन करण्यात आले असून महिला बचत गटांची वेगळी ओळख या माध्यमातून निर्माण होणार आहे.तेल्हारा जत्रेचे आयोजन तेल्हाऱ्याच्या धर्तीवर प्रथमच  होत आहे .  यामध्ये नातवांपासून आजी आजोबांना एकच ठिकाणी खिळवून ठेवणारी ही अभूतपूर्व जत्रा भरणार आहे व यामध्ये कला , खानपान, संस्कृती, खरेदी , आत्मनिर्भरता , रोजगार ,पारंपरिक खेळ, देशी बियाण्याचे विविध प्रकारचे बियाणे , सोबतच खेळ , खेळणी ,विरंगुळा , मनोरंजन, जादूचे प्रयोग , शिवाय तुफान विनोदासह सांस्कृतिक मेजवानी असा भरगच्च कार्यक्रम तेल्हारा येथिल सेठ बन्सीधर विद्यालयाच्या प्रांगणात दि ,27 व 28 मे ला सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आयोजित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील महिला बचत गटांनी या तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण बनवत असलेल्या वस्तूची दुकाने लावावी असे लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना सांगीतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button