जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अटी-शर्ती न ठेवता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – धीरज फाटे

June 18, 2026

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:-सागर रावण चोरे तालुका प्रतिनिधी शेगाव

अटी-शर्ती न ठेवता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – धीरज फाटे

खामगाव : राज्यातील शेतकरी आज आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला असून त्याला दिलासा देण्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारच्या अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब

ठाकरे पक्षाचे धीरज फाटे यांनी केली आहे.
नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून अटी-शर्ती लावून कर्जमाफी देणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे लहान, मोठे, अल्पभूधारक, मध्यम भूधारक अशा सर्व शेतकऱ्यांना कोणताही भेदभाव न करता सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा.शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र आज तोच कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. शासनाने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घेऊन अटी-शर्ती विरहित सरसकट कर्जमाफी लागू करावी. अन्यथा राज्यभर शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होऊन मोठे लोकआंदोलन उभे राहू शकते,” असा इशारा धीरज फाटे यांनी दिला आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अटी-शर्ती विरहित सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी धीरज फाटे यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button