गुन्हेगारीमहाराष्ट्रमुक्ताईनगर

रुईखेडा येथे वसुलीच्या कामात अडथळा : एका इसमावर गुन्हा दाखल.

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी) तालुक्यातील रुईखेडा ग्रा प कडून कर वसूलीची धडक कारवाई सुरू आहे.तीन चार दिवसापासून थकबाकीदार यांचे नळ कनेक्शन तोडणेची कारवाई ग्रा प कडून करण्यात येत आहे.
परवा रामगिर गोसावी याच्या कडील थकबाकी वसुली करण्यासाठी पथक घरी धडकल्याचा राग मनात ठेवून रात्री रामगिर गोसावी याने दारूच्या नशेत ग्रा प च्या कर वसुली पथकास व ग्रा प च्या पदाधिकऱ्याना बेछूट शिवीगाळ केल्याने आज सरपंच सौ उषा अजय गुरचळ यांच्या फिर्यादी वरून रामगिर कडूगिर गोसावी याच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात भा द वी ५०४ ,५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

ग्रा प ची कर वसुलीची कारवाई या पुढे देखील सुरूच राहणार असून, ग्रा प कर वसुलीच्या कामात अडथळा आणणाऱ्या इसमाविरुद्ध ग्रा प मार्फत गुन्हे दाखल केले जातील, अशी प्रतिक्रिया सरपंच सौ उषा अजय गुरचळ आणि ग्राम विकास अधिकारी दीपक कोसोदे यांनी माध्यमांना दिली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button