Uncategorized

अकोट विधानसभा निवडणूक लढवणार ; अनिल गावंडे यांची घोषणा , तेल्हारा येथील आढावा बैठकीतून अनिल गावंडे यांनी फुंकले रणसिंग!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि १३ :- तेल्हारा येथील एका सभागृहामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व लोकजागर मंचच्या वतीने १२ मे ला आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अकोट मतदार संघातून निवडणूक लढविण्याबाबत तेल्हारा येथून रणसिंग फुंकले असून तशी घोषणा त्यांनी बैठकीमध्ये करून निवडणुकीबाबतचे नियोजन कार्यकर्त्यांना सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही महिन्यातच आगामी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तिविल्या जात असून त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष , लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आपण मागच्या वेळेस तेल्हारा तालुक्यामध्ये सर्वाधिक मते घेतली होती परंतु अकोट तालुक्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो असल्याचे मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केले. त्या अनुषंगाने निवडणुकी संदर्भात वेळेवर निर्णय न घेता आतापासूनच आपण निवडणुकी संदर्भात योग्य ते नियोजन करणे आवश्यक असल्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अनिल गावंडे यांनी सांगितले .आयोजित बैठकीमध्ये त्यांनी बूथ रचनेवर व इतर आवश्यक गोष्टीवर कार्यकर्त्यांनी कसे लक्ष केंद्रित करून काम करावे याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या व आगामी विधानसभेच्या निवडणुकी करिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून अकोट मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी आपण प्रत्येक गावामध्ये मताधिक्य मिळविण्याकरिता योग्य ते नियोजन करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आढावा बैठकी मध्ये बूथ रचनेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून निवडणुकीकरिता आवश्यक सर्व गोष्टीचा या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला असून तशा प्रकारच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. आयोजित बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकजागर मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची अनिल गावंडे यांची मागणी!
१० मे ला हिवरखेड परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवांचे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले. अनेक घरांची पडझड झाली, आणि घरांवरील टीन पत्रे उडून गेली, वादळाला जे जे समोर दिसत होते ते सर्व नेस्तनाबूत करीत गेला. रात्रीची वेळ असल्याने झालेल्या नुकसानीची पूर्णपणे माहिती मिळू शकली नाही परंतु
ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, संत्रा ,आंबा ,केळी ,पपई अशा कित्येक फळ भाजीपाला धान्य व विविध पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त अनेक वृक्ष ऊन्मळून पडली. अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले. त्यामुळे शासकीय स्तरावरून तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने मदत मिळवून देण्यात येईल याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली असून व त्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सांगण्यात आले असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button