अकॅडमिक स्कूल गोमेधर येथे “अंकुरण 2025” स्नेहसंमेलन संपन्न

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
गोमेधर: अकॅडमिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गोमेधर येथे “अंकुरण 2025” या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य व उत्साहपूर्ण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवर यांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिक रंगतदार ठरला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. उद्धव शेरे पाटील (राष्ट्रीय प्रेरणादायी व्याख्याते) यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक नागरिक होते. तसेच शाळेचे उपाध्यक्ष मोहनराव वानखेडे पाटील आणि सचिव गीतादेवी नागरिक यांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केशवराव जागृत (माजी सभापती जि. प .बुलढाणा), मा.श्री मधुकर वानखेडे साहेब, (गटशिक्षणाधिकारी मेहकर ), मा. श्री शरद जाधव (माजी सरपंच लोणी गवळी), मा. श्री मदनराव होणे (शिवसेना तालुकाप्रमुख), मा. श्री आजिनाथ मोरे (ठाणेदार पो.स्टे. जानेफळ) मा. श्री सुमित पाटील (अध्यक्ष प्रगती अर्बन), मा. श्री.गजानन वडणकर (सरपंच जानेफळ), मा. श्री सुभाष अवसरमोल (सरपंच गोमेधर), मा. श्री . सुरेश काठोळे (सरपंच उटी), मा.श्री विशाल जवंजाळ (सरपंच लोणी काळे ), मा. श्री.अनील मंजुळकर (उपसरपंच गोमेधर ),मा. श्री विजय कृपाळ (उपसरपंच जानेफळ), मा. श्री विजयराव जाधव (पो. पा. गोमेधर) आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागला.
मा. उद्धव शेरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षण हे केवळ परीक्षांपुरते मर्यादित नसून, ते आपले भविष्य घडवण्यासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सतत नवीन कौशल्ये आत्मसात करत स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा.”
मा. केशवराव जागृत यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत सांगितले की, “गावखेड्यांतील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्यांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करावी. शिक्षणाशिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती शक्य नाही.”
प्रा. डॉ. दीपक नागरिक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांत सहभाग घ्यावा. अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि भविष्यात आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत होते.”
शाळेच्या उपाध्यक्ष मोहनराव वानखेडे यांनी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत सांगितले की, “विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपली ओळख निर्माण करावी” सचिव गीतादेवी नागरिक यांनी विद्यार्थिनींच्या सहभागाचे कौतुक केले.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, गीते, समूहगायन, एकपात्री अभिनय आदींचे सादरीकरण केले. प्रेक्षकांनी या कार्यक्रमांना भरभरून दाद दिली. विशेषतः शालेय जीवनावर आधारित नाटिकेने व भ्रूणहत्या या एकपात्री प्रयोगाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या प्राचार्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि आनंददायक ठरला. विद्यार्थ्यांना या स्नेहसंमेलनातून नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असून, ते अधिक जोमाने पुढे जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
माननीय संपादक/ वार्ताहर,
दैनिक…….
आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये उपरोक्त बातमीस प्रसिद्धी देऊन उपकृत करावे ही विनंती
प्राचार्य
अकॅडमिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गोमेधर, ता. मेहकर, जि. बुलढाणा



