महाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिक

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात “जैव-खते रोजगार कौशल्य” उपक्रम उत्साहात संपन्न.


मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे पीएम- उषा उपक्रमांतर्गत जैव-खते रोजगार कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला होता. हा अभ्यासक्रम डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडला. त्यास प्रथम वर्ष विज्ञान व वाणिज्य शाखेच्या मिळून 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून विज्ञान महाविद्यालय, मलकापूर येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डी. एस. कोल्हे यांना बोलविण्यात आले. अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना जैव-खते अभ्यासासाठी लागणारे सर्व साहित्य महाविद्यालयाकडून देण्यात आले. या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीसाठी सक्षम करणे व तसेच जैव-खताच्या वापरामुळे मातीची सुपीकता वाढविणे व रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची होणारी हानी कशी कमी करता येईल हा हेतू होता. सोबतच ही जैव-खते शेतात कशी व केव्हा वापरावी याचे पण मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button